Friday, 4 November 2022

पालशेतचे 'प्राचार्य माधव बापट' यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती !

पालशेतचे 'प्राचार्य माधव बापट' यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती !


निवोशी/ गुहागर: उदय दणदणे
दि.०५ नोव्हेंबर २०२२

गुहागर तालुक्यातील पालशेत बापट आळी येथील रहिवासी अभ्यासू व्यक्तीमत्व प्राचार्य माधव बापट यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.


पालशेत गावचे रहिवासी असलेले माधव बापट यांनी नोकरीची सुरूवात सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून केली त्यानंतर ते गणित विभागप्रमुख म्हणून काम करत अनेक विद्यार्थ्यांना प्रगतीच्या शिखरावर नेले आहे. आपल्या अभ्यासू बुद्धीने ते चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त अध्यापन व संशोधनाचे कार्य करत आहेत. ३० वर्षे ज्ञानार्जन देत असतानाच त्यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...