Wednesday, 9 November 2022

माझगाव डॉक शिपबिल्डर्स पतपेढी निवडणूकीत विद्यमान संचालक पॅनेलचे १५ उमेदवार !

माझगाव डॉक शिपबिल्डर्स पतपेढी निवडणूकीत विद्यमान संचालक पॅनेलचे १५ उमेदवार !


मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : गेली २१ वर्षे कार्यरत असलेल्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स कर्मचारी सहकारी पतपेढीत श्री समर्थ समिती पॅनेल हे कंपनीबाहेरील हस्तक्षेपापासून आलिप्त राहिल्याची परंपरा आणि ओळख बाळगून आहे. या समितीच्या विद्यमान संचालकांचे पॅनेलचे १५ उमेदवार संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणात आहेत.

समीर लाड, रमेश शिंदे, विजय कासेकर, प्रविण चव्हाण, सदीप दळवी, सचिन पवार, निशांत नांदगांवकर, शीतल पेठे, विनोद चौहान, किरण जाधव हे सर्वसाधारण मतदारसंघातून तर स्मिता मेस्त्री, सुप्रिया पवार, महिला राखीव, प्रमोद तवटे इतर मागासवर्गीय, पांडुरंग दाईंगडे विशेष मागासवर्ग तर संदीप कोंडविलकर हे अनुसूचित जाती-जमाती या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ही निवडणूक शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी मतदानाची वेळ आहे. पतपेढीचे ३ हजारांहून अधिक मतदार असून अधिकाधिक सभासदांनी उपस्थित राहून मतदान करावे, असे आवाहन श्री समर्थ समितीच्या विद्यमान संचालकांचे पॅनेलच्या वतीने करण्यात आले आहे. पॅनेलची प्रचारात आघाडी असून कामगार व अधिकारी वर्गाचा पॅनेलला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...