जळगाव, अखलाख देशमुख, दि ०९ : शिवसेनेचे लढाऊ व आक्रमक नेते तसेच राज्यसभेचे खासदार 'श्री. संजय राऊत' यांचा बुधवार दि.९ नोंहेबर २०२२ रोजी मा. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.या निर्णयाचे स्वागत तसेच न्यायालयाचे आभार व्यक्त करत शिवसेनेसह, युवा सेना विद्यार्थी सेनेसह शहराच्या प्रथम नागरिक व महापौर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका आणि जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
युवासेना कॉलेज कक्ष जळगाव शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी आनंद व उत्साह देणारा असा हा निर्णय असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. यावेळी शिवसेना संघटक श्री. गजानन मालपूरे, युवा सेनेचे विभागीय सचिव श्री. विराज कावडिया, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख श्री.प्रितम शिंदे, श्री.संदिप सूर्यवंशी, श्री.अमित जगताप, श्री.उमाकांत जाधव, श्री.भूषण सोनवणे, श्री.जयेश नेवे, कु. ऋतुजा चौधरी, कु. गायत्री भोईटे, श्री. पृथ्वी ठाकूर, श्री.प्रवीण भगत, श्री.यश लोढा, श्री.ऋषिकेश देशमुख, श्री.भावेश सोनवणे, श्री.सैफ मन्सूरी, श्री.कृष्णा राजपूत, श्री.विक्रम गायकवाड, श्री.कैवल्य कोळी, श्री.हुजेफा बागवान, श्री.आर्यन करोसिया, श्री.हर्षल पाटील, श्री.गौरव पाटील, श्री.पारस तायडे, श्री.सैफ मोमीन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी फटाके फोडताच उपस्थितांनी जोरदार घोषणा केल्या. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला !; अखेर सत्याचा विजय झाला, ही ताकद कोणाची ? शिवसेनेची, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

No comments:
Post a Comment