औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०९ : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या औरंगाबाद येथील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज (डीआयटीएमएस) महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेच्या (नॅक) तज्ज्ञ समितीने 3 व 4 नोव्हेंबर रोजी भेट देत पाहणी केली होती.
या पाहणीनंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले असून त्यात ‘डीआयटीएमएस’ महाविद्यालयास ‘A’ ग्रेडसह 3.2 गुण मिळाले आहे. पहिल्याच ‘सायकल’मध्ये ‘डीआयटीएमएस’ महाविद्यालयाने ही श्रेणी प्राप्त केली आहे हे विशेष. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे आ. सतीश चव्हाण यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment