Sunday, 6 November 2022

अभिजीत राणे युथ फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन !

अभिजीत राणे युथ फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :

          अभिजीत राणे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे यांच्या ८ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धा खुल्या गटासाठी असून १८ वर्षावरील कोणीही यात सहभागी होऊ शकतो. १) मी पंतप्रधान असतो तर, २) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ३) करोना नंतरचे जग, ४) शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, ५) महिलांचे देशाच्या विकासातील स्थान असे विषय असून स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर १०००-१२०० शब्दा पर्यंत निबंध स्व-हस्ताक्षरात लिहून ( टाईप केलेला नाही) दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत स्पीड पोस्ट किंवा कुरियरने पाठविणे आवश्यक आहे. पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे १२५०/- १०००/- ७५०/- ५००/- आणि २५०/- रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. (तसेच पाच उत्तेजनार्थ पारितोषिके- सन्मानचिन्ह सन्मानपत्र) देण्यात येतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.आपले निबंध, ३० नोव्हेंबर पर्यंत स्पर्धा प्रमुख, गणेश हिरवे २/१२ पार्वती निवास, रामनगर, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई - ४०००६० येथे पाठवावीत.

आधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ संपर्क करावा.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...