Tuesday, 8 November 2022

वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारने किसन सुरवसे सन्मानित !

वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारने किसन सुरवसे सन्मानित !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :

          भारतीय जनता पार्टी कोकण शिक्षक विभाग यांच्या वतीने स्व.वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार कोकण विभाग- २०२२ यावेळी रायगड जिल्हा परिषद शिवभुमी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते पोलादपूर येथील क्रिडा शिक्षक किसन सुरवसे यांना कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब आणि सहकारी शिक्षक वर्ग उपस्थित होते. किसन सुरवसे हे कांगोरी गड माध्यमिक विद्यालयात मराठी, हिंदी विषयाचे शिक्षक असून ते गेली २७ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सूरवसे याना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे मित्र परिवार शिक्षक सहकारी आणि तालुक्यांतील मान्यवर वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...