मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
अभिजीत राणे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे यांच्या ८ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या पत्रलेखकांनी १ जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या आपल्या कोणत्याही दोन पात्रांची झेरॉक्स दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत स्पीड पोस्ट किंवा कुरियरने पाठविणे आवश्यक आहे.पाहिले पाच विजेते आणि दहा उत्तेजनार्थ अशी एकूण १५ पारितोषिके देण्यात येतील.पत्र lलेखकांनी आपली पत्रे ...स्पर्धा प्रमुख, गणेश हिरवे २/१२ पार्वती निवास, रामनगर, बांद्रेकरवाडी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई - ४०००६० येथे पाठवावीत.
आधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ संपर्क करावा.

No comments:
Post a Comment