Tuesday, 8 November 2022

आरपीएफचे उपनिरीक्षक राजकुमार वर्शे आणि ए.एस.आय.श्री.रवींद्र सानप यांचा वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्यावतीने सत्कार !

आरपीएफचे उपनिरीक्षक राजकुमार वर्शे आणि ए.एस.आय.श्री.रवींद्र सानप यांचा वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्यावतीने सत्कार !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
          वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्यावतीने जागतिक मानवाधिकारचे राष्ट्रीय अध्यक्ष व AIACPC चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मंगळवार दिनांक ८/११/२०२२ रोजी भायखळा स्थानक आर.पी.एफ.कार्यालयात आरपीएफचे उपनिरीक्षक राजकुमार वर्शे यांनी ६/११/२०२२ रोजी कल्याण दिशेच्या लेडीज फर्स्ट क्लासच्या डब्यात एक महिलेने आपल्या लहान मुलाला आधी बसविले. नंतर ती बसणार इतक्यात लोकल सुरू झाली. या महिलेचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात ड्युटीवर असणारे श्रीराजकुमार वर्शे यांनी या महिलेला आधार देत मोठ्या शिताफीने आत ढकलले. त्यामुळे महिलेचे प्राण बचावले. यावेळी उपनिरीक्षक वर्शे यांचाही तोल जाऊन तेही फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये पडण्याची शक्यता होती. तसेच २८/o८/२२ रोजी ए.एस.आय. श्री.रवींद्र सानप यांनी रेल्वे रुळावर गाडी समोर आत्महत्या करण्यासाठी उभी असलेल्या अल्पवयीन मुलीला स्वतः रुळावर धावत जाऊन तिला गाडी समोरून बाजूला खेचून तिचा जीव वाचवला. अशा आपला जीव धोक्यात घालून प्रवाशाना मदत करणाऱ्या या दोघांच्या हिम्मतीचे कौतुक करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी AIACPC चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे, सचिव श्री.अमित देशमुख, WHRAF चे मुंबई उपाध्यक्ष श्री.महेश सरफरे, सरचिटणीस सौ. प्रमिला अडसूळ, मुंबई सचिव सौ.ऋतिका पंदूगडे, सहसचिव श्री.अक्षय शिंगरे, AIACPC चे मुंबई सचिव श्री. हितेश गायकवाड, श्री.लीतेश केरकर, घाट.सचिव श्री.प्रकाश आंब्रे,शिवडी विधा.सचिव नंदकिशोर बागवे,श्री.लक्ष्मण साठे, श्री.सुहास परब, अंजली भोसले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...