जव्हार, जितेंद्र मोरघा :
डहाणू तालुक्यातील सायवन गेठीपाडा येथील जानु बारक्या राऊत (वय - १०१) या आजोबाला यारी दोस्ती ग्रुप कडून किराणा कीट आणि चादर, स्वेटर देवून मदत केली.
सदर आजोबा हे एकटेच राहत असून त्यांना कुणीही पालनपोषण करणारे नाही. ते एका तोडक्या मोडक्या कुडाच्या झोपडीत गावाच्या वेशीवर डोंगरात राहत आहेत. त्यांच्या गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार त्याचे वय हे अंदांजे १०१ वर्ष असेल. या वयात त्यांना एकटे राहणे आणि आपला उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण जात आहे.
ही आजोबांची परिस्थिती बघून स्थानिक यारी दोस्ती ग्रुप सदस्यांनी त्या आजोबांना ग्रुप कडून मदत मिळावी म्हणून ग्रुपला कळविले होते. ग्रुप कडून त्या आजोबांना त्यांच्या घरी जावून त्यांना किराणा कीट आणि चादर, स्वेटर देवून मदत करण्यात आली.
सामाजिक कर्तव्य म्हणून आज यारी दोस्ती ग्रुप अशी मदत करताना आपल्याला दिसून येत आहे. अशी मदत ग्रुप मधील सदस्य १००, २०० रुपये निस्वार्थ भावनेने गोळा करून मदत करत असतात. या मदती साठी त्या आजोबांनी ग्रुप चे खूप खूप आभार मानले.

No comments:
Post a Comment