वरिष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांची राष्ट्रीय पत्रकार विकास महा समिती संघटनेत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती !
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवलीतील स्थानिक, वरिष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांची भोपाल, मध्यप्रदेश येथील राष्ट्रीय पत्रकार विकास महा समिती संघटनेत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय पत्रकार विकास महा समिती संघटनेचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असे देशातील अनेक राज्यांत कार्य असून मुख्य कार्यालय भोपाल, मध्यप्रदेश येथे असून या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल धाकड आहेत. पत्रकारांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी, समस्या किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय या सर्व वेळी ही संघटना पत्रकारासोबत ठामपणे उभी रहाते.
अशा या राष्ट्रीय संघटनेत कल्याण येथील वरिष्ठ पत्रकार, संपादक, तसेच विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयातून पत्रकारिता करणारे नारायण सुरोशी यांची या संघटनेत महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल, पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदन करण्यात आले .


अभिनंदन 💐💐💐💐💐💐
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteCongratulations 🎉🥰😎
ReplyDeleteअभिनंदन
ReplyDeleteअभिनंदन... सुरोशी साहेब...!
ReplyDelete