Monday, 7 November 2022

रत्न सिंधु मित्र मंडळ (रजि.) अंधेरी (पूर्व) यांच्या वतीने श्रीमती ऋतुजा लटके यांचा सत्कार !

रत्न सिंधु मित्र मंडळ (रजि.) अंधेरी (पूर्व) यांच्या वतीने श्रीमती ऋतुजा लटके यांचा सत्कार !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
         अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यांच्या या मोठ्या विजयाने अखेर शाहूवाडी तालुक्याच्या सुनबाई अंधेरी पूर्व मतदारसंघांच्या आमदार झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर तालुक्यातील शिवसैनिकांसह, जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
        रत्न सिंधु मित्र मंडळ (रजि.) अंधेरी (पूर्व) यांच्यावतीने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय झाला. या निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी रविंद्र घाटगे, समीर राऊळ, सुनील सावंत, संतोष पवार, महेंद्र घाटगे, विजय गावडे, संदीप पवार, गणपत राऊळ, संतोष गावडे, सुधीर लाले आदी मान्यवर उपस्थित होते.
         तर सरुड, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, येळवणजुगाई, शेंबवणे आदी परिसरात शिवसैनिकांसह, लटके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. श्रीमती ऋतुजा लटके या मुळच्या शाहूवाडी तालुक्यातील शेबंवणे पैकी धुमकवाडी येथील आहेत.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...