Sunday, 25 December 2022

कांग्रेस इंटक (कामगार) जिल्हाध्यक्षपदी नीलेश आंबेवाडीकर यांची निवड !

कांग्रेस इंटक (कामगार) जिल्हाध्यक्षपदी नीलेश आंबेवाडीकर यांची निवड !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : कॉंग्रेस पक्षाच्या इंटक (कामगार कॉंग्रेस) च्या जिल्हा अध्यक्ष पदी डॉ निलेश अंबेवाडिकर यांची निवड कॉंग्रेस पक्षाची महत्वाची कामगार आघाडी इंडियन नैशनल ट्रेड यूनियन कॉंग्रेस (इंटक) च्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी डॉ निलेश अंबेवाडिकर यांची नियुक्ति करण्यात आलेली आहे. 

सदरील नियुक्ति महाराष्ट्र इंटक चे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केली व नियुक्ति पत्र कॉंग्रेस विधिमंडळ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे देण्यात आले, डॉ निलेश अंबेवाडिकर यांनी या आधी विद्यार्थी कॉंग्रेस मधे  काम केले आहे तसेच अनेक वर्षापासून युवक कॉंग्रेस चे काम करत आहेत, इथून पुढे औरंगाबाद जिल्हातील 4 प्रमुख औद्योगिक क्षेत्रमधे कमगारांच्या समस्या निवारणासाठी ते काम करणार आहेत तसेच त्यांच्या अर्थशास्त्र मधील पीएचडी चा विषय सुद्धा असंघटित क्षेत्रातील कामगरांच्या समस्याशी निगड़ित होता 
यावेळी महाराष्ट्र चे महासचिव डॉ जफर अहमद खान, अल्पसंख्यक विभागचे राष्ट्रीय संयोजक एड.आकाश छाजेड, आकाश रगड़े, सचीन फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती..
या विषयी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष डॉ कल्याण काळे, शहर अध्यक्ष युसूफ शेख यांनी नियुक्ति बद्द्ल शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...