पाचशे वाहन चालकांनी घेतला मोफत नेत्र तपासणीचा लाभ !
'जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी' आणि 'व्हिजन स्प्रिंग' फाऊंडेशनचा उपक्रम...
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी आणि व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशन आयोजित वाहन मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील अनेक गरजू रिक्षा चालक, बस चालक, ट्रक आणि इतर खासगी वाहनचालक यांच्यासाठी हे शिबीर आयोजित केल्याची माहिती जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली.
गरजूंना धावपळीच्या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हे शिबिर आवश्यक होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिबिरास व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशनचे सर्व स्टाफ, शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटक सुषमा यादगिरे, गणेश मुळे, ऋषिकेश ढंगारे, आकाश पवार, व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशनचे डॉ. अब्दुल रेहमान, अंजली वानखेडे, मनीषा बागुल, अरुणा पवार आदींची उपस्थित होती.
No comments:
Post a Comment