जळगाव रनर्स ग्रूप तर्फे ४ डिसेंबर रोजी टाटा एआयजीतर्फे खान्देश हाफ मॅरेथॉन आज टी-शर्ट आणि मेडल चे अनावरण !
जळगाव, अखलाख देशमुख, दि ३ : शहरांमध्ये जळगाव रनर्स ग्रुप तर्फे दरवर्षी खान्देश हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात येत असते. याच अनुषंगाने रनर्स ग्रुप तर्फे रविवार दि.४ डिसेंबर २०२२ रोजी ३,५,१०,२१ किलोमीटर अंतराच्या खान्देश हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवार दि.३ डिसेंबर रोजी शहरातील खान्देश सेंट्रल येथे प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका ,जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार गोदावरी मेडिकल कालेजचे डाँ. वैभव पाटील यांच्या हस्ते टाटा एआयजी खान्देश हाफ मरेथॉन टि शर्ट व मेडलचे अनावरण करण्यात आले. यावेळी रनर्स ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजामध्ये व्यायाम व फिटनेस बाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जळगाव रनर्स ग्रुपकडून सतत विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. सन २०१७ पासून शहरात दरवर्षी या मरेथॉन चे आयोजन रनर्स ग्रुप तर्फे केले जात आहे. रविवार दि.४ रोजी पहाटे पाच वाजता सागरपार्क येथुन मरेथॉनला सुरवात होईल.या मॅरेथॉनमध्ये सर्वानी सहभागी व्हावे असे जळगाव रनर्स ग्रूपचे अध्यक्ष श्री.किरण बच्छाव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment