Thursday 29 December 2022

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे निर्देश !

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे निर्देश !

*_• G-20 च्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची संयुक्त पाहणी_*

  औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि  २९ : जळगाव टी पॉइंट ते अजिंठा लेणी पर्यंतच्या रस्त्याची कामे जानेवारी अखेरपर्यंत  पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी हर्सूल ते अजिंठा रस्त्याची संयुक्त पाहणी केली.

तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून रस्त्याचे काम पुर्ण करावे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही  श्री  पाण्डेय यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, उपविभागीय  अधिकारी रामेश्वर राडगे, तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार शीतल राजपूत, सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत, सोयगांव तहसीलदार श्री जसवंत, पल्लवी सोनवणे, कार्यकारी अभियंता, राष्टीय महामार्ग औरंगाबाद, विकास महाले, कार्यकारी अभियंता राष्टीय महामार्ग धुळे, शाखा अभियंता सागर कळंब, गजानन कामेकर तसेच  संबंधित अधिकारी  व कर्मचारी रस्ते पाहणी दरम्यान उपस्थित होते.

पर्यटकांची संख्या पाहता अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका आणि डॉक्टराची नेमणूक करावी. एक खिडकी तिकीटाची निर्मिती तसेच वीजपुरवठा खंडित होवू नये म्हणून महावितरण आणि वन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग यांनी पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन  देण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले .

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...