Friday 30 December 2022

गावातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य विभागाची जबाबदारी : "डॉ.दिपेश पष्टे"

गावातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य विभागाची जबाबदारी : "डॉ.दिपेश पष्टे"

*शिवकन्या प्रतिष्ठान व आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी* 

*सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धावून येणारे वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : डॉ.दिपेश पष्टे*

भिवंडी/दि.30
शिवकन्या प्रतिष्ठान व आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश जाधव व आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांच्या उपस्थितीत कै.वि.अ.पाटील विद्यालय, दिघाशी, ता.भिवंडी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

भारताचे भविष्य म्हणून समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ असणे महत्त्वाचे आहे. समाजामध्ये बहुतांश लोकांना आरोग्याविषयी जागृती नसल्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने युवा समाजसेवक दिवेश पष्टे(आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कृत) व संत निवृत्तीनाथ भक्त मंडळचे सचिव माही चौधरी यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून आज दिघाशी येथील हायस्कूल मध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मुलींना प्रौढावस्था मधील माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची तपासणी करत असताना विद्यार्थ्यांना त्वचारोग, डोळ्यांचे आजार, कॅल्शियमची कमतरता, हार्मोन ची कमतरता प्रामुख्याने दिसून आली. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात यावी असे डॉ.अमित शर्मा व गणेश उमराठकर यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेट देऊन औषधांची व तपासणीची उपलब्धता करून देण्यासाठी आपले मानवाधिकार फाउंडेशन मागणी करेल असे आश्वासन डॉ.दिपेश पष्टे यांनी यावेळी बोलताना दिले. 

माध्यमिक शाळेमध्ये होत असलेल्या आरोग्य तपासणीची माहिती मिळताच कै.भाई पाटील समाज उन्नती मंडळ चे सदस्य सुधीर पाटील, भारतीय कामगार सेनेचे सचिव मिलिंद चौधरी, दिघाशी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनीही आपली उपस्थिती नोंदवून आरोग्य तपासणी साठी सहकार्य व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवकन्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून माही चौधरी व दिवेश पष्टे याच्या सहकार्यातून करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक एस के चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर सर्व शिक्षकांनी मुलांमध्ये असलेली शिस्त दाखवून असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थ्यांचे आजार माहिती करून घेण्यासाठी काही पालकांनीही उपस्थिती दर्शविली होती.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...