Friday, 2 December 2022

शेतकऱ्यांना विम्याची पुर्ण रक्कम द्या अन्यथा संघर्ष अटळ - रविकांत तुपकर

शेतकऱ्यांना विम्याची पुर्ण रक्कम द्या अन्यथा संघर्ष अटळ - रविकांत तुपकर 

पुणे, अखलाख देशमुख‌, दि २ :  पुणे येथे आज राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण व कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली. पीकविमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणाविरोधात आज आक्रमक भूमिका घेत, पीकविमा कंपन्याविरोधात सरकारने कडक भूमिका घ्यावी असे ठणकावून सांगितले.

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये  कार्यरत असलेल्या AIC कृषीविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रिमियमपेक्षाही कमी रक्कम टाकून त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. आता या सर्व जिल्ह्यांमधील कार्यालये बंद ठेऊन ते शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी या कार्यालयांवर जात आहेत, पण बंद टाळे पाहून उद्विग्न मनःस्थितीत परतत आहेत. कंपनीचे कर्मचारी व अधिकारी फोनही उचलत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी तक्रार तरी कुठे करायची? आम्ही वेळोवेळी कृषी अधिकारी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा कृषी अधिक्षकांनीही या बोगस व बेजबाबदार कंपनीच्या विरोधात पोलिस तक्रार केलेली आहे.

या सर्व प्रकरणामुळे शेतकऱ्यांमधला रोष वाढत आहे. पुढे शेतकरी व कंपनीमध्ये बेबनाव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी शासन व कंपनी जबाबदार असेल, असे रविकांत तुपकर यांनी आज कृषी आयुक्त सुनिल चव्हाण व सह संचालक विनय आवटे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सांगितले. राज्य सरकारने यात मध्यस्थी करुन शेतकऱ्यांना विम्याची पूर्ण रक्कम मिळवून द्यावी. अन्यथा शेतकरी विरुद्ध विमाकंपनी असा संघर्ष अटळ आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...