Monday, 26 December 2022

वंचित बहुजन युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना क्रिडा जगतातील डॉक्टर (मानद) हि पदवी बहाल.. .!!

वंचित बहुजन युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना क्रिडा जगतातील डॉक्टर (मानद) हि पदवी बहाल.. .!!

दिल्ली, अखलाख देशमुख दि २६ : दिनांक 25/12/2022 रोजी इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी नवी दिल्ली यांच्याकडून वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना डॉक्टरेट प्रधान करत असताना, इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी डिग्री प्रधान समारंभा प्रसंगी श्रीमती रोशनी लाल ट्रस्टी आय आयु श्री पियुष पंडित, फाउंडर एस बी पी अँड आय आय यु व मिस हिरामणी रेस्क्यू रोमानिया, डॉ निधि बंसल मेंबर कोर कमिटी आदी मान्यवर व स्वतः निलेश विश्वकर्मा उपस्थित होते.

निलेश विश्वकर्मा यांना ही डॉक्टरेट पदवी क्रीडा या विषयात मिळाली आहे. डिग्री प्रधान समारंभ हा इंटरनॅशनल इंटरशिप युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये नवी दिल्ली येथे पार पडला. युवकांचे प्रेरणा स्थान असलेले निलेश विश्वकर्मा यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील युवकांना स्फूर्ती मिळत आहे. निलेश विश्वकर्मा नेहमीच युवकांसाठी आयकॉन व्यक्तिमत्व आहे, ही एक कौतुकाची बाब आहे एखाद्या नामांकित विद्यापीठातर्फे त्यांचा डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरव करण्यात आला.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...