Friday, 20 January 2023

वरप गावच्या दातृत्वामुळे जांभूळ ग्रामस्थांना उपकेंद्र, सरपंच व तालुका वैद्यकीय अधिका-याकडून कौतुक, जिल्ह्यात आदर्श !

वरप गावच्या दातृत्वामुळे जांभूळ ग्रामस्थांना उपकेंद्र, सरपंच व तालुका वैद्यकीय अधिका-याकडून कौतुक, जिल्ह्यात आदर्श !

कल्याण, (संजय कांबळे) : १५व्या वित्त आयोगातून निधी मंजूर असतानाही केवळ जागा उपलब्ध नसल्याने नागरीकांसाठी अंत्यत महत्त्वाचे असे आरोग्य उपकेंद्र होत नव्हते, परंतु ही उणीव वरपगावच्या दानशूर गायकर, तरे आणि आयरेकर यांच्या दातृत्वामुळे दूर झाली असून ४ गुंठे जागा दान दिल्याने जांभूळ व परिसरातील लोकांना आता आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून सोईसुविधा मिळणार आहे. यामुळेच ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी या कुंटूबाचे कौतुक केलं आहे. तसेच आभार ही मानले आहे.

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर जांभूळ हे गाव वसलेले आहे. अंबरनाथ, बदलापूर अशा मोठ्या शहराला लागून असूनही गावाने गावपण जपले आहे, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, स्वच्छता, रस्ते दिवाबत्ती गटारे, शाळा, आदीवाशी वाडी, आदी सर्व सोईसुविधा येथे आहेत, लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, आणि ग्रामस्थ सजग असतील तर गावाचे रुप कसे पालटते यांचे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात जांभूळ ग्रामपंचायतीचे उदाहरण देता येईल. 

तत्कालीन ग्रामसेवक बाळू कोकणे, सरपंच परिक्षित पिसाळ,उपसरपंच ज्योती जाधव, सुनिता गोरे, सुमन पिसाळ, गुलाब मुकणे, रेखा गायकवाड, अक्षय सांवत, राजाराम मुकणे, अशोक शिंदे, सध्याचे ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे, त्यांचे  कर्मचारी राजन साटम, महेश आयरेकर, नामदेव जाधव, निलेश आयरेकर व सहकारी यांनी गावात काही काम बाकी ठेवले आहे असे वाटत नाही. केवळ आरोग्य उपकेंद्र नव्हते हिच उणीव भासत असतांनाच जांभूळ ग्रामपंचायतीस मंजूर असलेले आरोग्य उपकेंद्रासाठी जांभूळ गावातील दानशूर "आयरेकर" कुटुंबातील, श्रीमती सीताबाई शांताराम आयरेकर, सौ ताईबाई काळूराम तरे, सौ हर्षला हरिश्चंद्र गायकर, सौ मंजू पद्माकर गायकर व कु.दिपेश भगवान भोईर यांनी त्यांचे पती/भाऊ/वडील/आजोबा "स्वर्गीय शांताराम दामोदर आयरेकर" यांच्या स्मृति प्रित्यर्थ जांभूळ गावाच्या आरोग्य उपकेंद्रासाठी चार गुंठे जागा आज बक्षीस पत्र करून जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावे केली. 

याप्रसंगी रामचंद्र गणपत आयरेकर तसेच  यशवंत गणपत आयरेकर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. आज रोजी ग्रामपंचायत जांभूळ मार्फत सर्व  दानशूर व्यक्तिमत्वांचे जांभूळ गावाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. प्रसंगी भारत मासाळ (तालुका आरोग्य अधिकारी, कल्याण) तसेच जी.बी सातदिवे , (स.दुय्यम निबंधक, कल्याण, परिक्षित हिराजी पिसाळ (सरपंच-ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ) कु अक्षय अशोक सावंत (सदस्य-ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ) ॲड.श्री शारिक बोंबे उपस्थित होते.

या जांभूळ ग्रमपंचायतीची वाटचाल ही जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायतीकडे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...