जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक २०२३ स्पर्धेचे महापौरांच्या हस्ते उदघाटन !
जळगाव, अखलाख देशमुख, दि ५ : जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक २०२३ स्पर्धेचे उदघाटन जळगाव येथे गुरुवार दि.५ जानेवारी २०२३ रोजी प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
टीचर्स स्पोर्टस फाऊंडेशन जळगाव आयोजित व के.पी.एंटरप्राइजेस प्रायोजित स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील ,टीचर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील बोरसे, अमर जैन, सौरभ कोठारी,शरद पाटील, मुकेश पाटील, संदीप पाटील, संदीप केदारे, समाधान पाटील, नाना साळूंखे, किशोर पाटील, सचिन सरकटे, भूषण पाटील, नारायण लोहार, जयवंत खैरनार, असीमखान, इम्रान शेख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment