जन-जागर यात्रा ......
जागर सावित्रीच्या लेकिंचा..!!
महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात...!
पुणे दि ५ : राष्ट्रवादी महिला काँग्रेसने सुरू केलेल्या जनजागरी यात्रेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते पुणे येथून काल करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १७५ वर्षांपूर्वी याच पुणे शहरातून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, महिलांच्या सबलीकरणासाठी, समाजातील अनिष्ट रूढी -परंपरा या विरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांच्या विरोधात शिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी त्यांनी जो लढा उभारला होता आज तशाच प्रकारचा लढा सद्यस्थितीत असणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस उभा करणार आहे.
या लढ्याचा शुभारंभ होत असताना खासदार पवार यांनी देशातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आरक्षण दिले, महिला आयोगाची स्थापना केली, सामाजिक -- औद्योगिक क्षेत्रात महिलांच्या सबलीकरणासाठी नेहमी पुढाकार घेतला, असे नेते शरद पवार यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ होणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी व कार्यकरत्यासाठी अभिमानाची बाब आहे.
यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी विद्याताई चव्हाण, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजीया खान , आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील,खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, महिला प्रदेश निरीक्षक डॉ. आशाताई मिरगे, सौ. रूपालीताई चाकणकर, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment