साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावात ऊस उत्पादकांसह कामगारांच्या बैठका !
'जनजागृती बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.!
जालना, अखलाख देशमुख, दि ५ : जालना सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावात विभागनिहाय, गटनिहाय शेतकरी ऊस उत्पादक बागायदार कामगार यांच्या 'जन'जागृती बैठका' आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 6 जानेवार 2023 पासून आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या 'जनजागृती बैठकांचे मुख्य संयोजक डॉ. संजय लाखेपाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. सदर बैठकीमध्ये कारखान्याचे माजी चेअरमन रामप्रसाद कुलवंत, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे, अंकुशराव राऊत, डि. के. मोरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, जालना सहकारी साखर कारखानाची चुकीच्या पध्दतीने व बेकायदेशीररित्या झालेली विक्री, खाजगी क़पन्यांची अदलाबदली, तब्बल एक तपापासून खरेदीदार खाजगी कंपनीने हेतूपुरस्सर कारखाना चालु न केल्यामुळे झालेली कारखाना संपत्ती, मशिनरीची वाताहत बेकायदा विल्हेवाट, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आणि कामगार, मजूर तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील कारागिर, छोटे व्यावसायिक यांचे न भरून येणारे नुकसान, सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गुन्हे, प्रतिबंधक कायद्यानुसार खाजगी कंपनी विरोधात केलेली कारवाई आणि कारखाना जमीन मशिनरी यांची जप्ती, समृध्दी महामार्गाच्या नावाखाली तयार केला जात असलेला 'थर्ड पार्टी इंटरेस्ट' आणि त्यातून नागवला जाणारा ऊस उत्पादक शेतकरी, बागायतदार, कामगार, आदी सर्व बिषयावर या बैठकात चर्चा करून सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बागायतदार कामगार मजूर यांच्या हितासाठी मूळ जालना सहकारी साखर कारखाना चालू करून परत जुनी ऊर्जितावस्था आणण्यासाठी या बैठकातून नियोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक डॉ. संजय लाखे पाटील यांनी सांगीतले.
पहिल्या टप्यात म्हणजे शुक्रवार दि. 06 रोजी सकाळी 10 वाजता देवी मंदीर, वाघरुळ, दुपारी 01 वाजता वटेश्वर मंदीर, नेर, दुपारी 04. वा. रामनगर, संध्या. 6. वाजता गोलापांगरी तरी सर्व आजी माजी पदाधिकारी, संचालक शेतकरी, कामगार बांधवानी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक डॉ. संजय लाखे पाटील, ॲड. सोपानराव भांदरगे, सुभाष कोळकर, सुरेशराव खडके, माऊली कदम, ज्ञानेश्वर डुकरे, अशोकराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, कमलाकरराव अंभुरे, अरुणराव वझरकर, प्रल्हादराव हेकाडे, लक्ष्मणराव राजे शिंदे, परसराम मोहिते आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment