बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये - कामगार विभागाचे आवाहन
बुलडाणा, प्रतिनिधी, दि. 9 : बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता नोंदणी आणि नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटीत कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. यासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. या संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक एक रूपया शुल्क आकारण्यात येते. त्याची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. याबाबतीत आपली फसवणूक झाल्यास कामगार कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणाऱ्या व्यक्तीविरूद्ध नजिकच्या पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment