कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे जंगी पटाला सुरवात !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ९ : सिल्लोड महोत्सव 2023 सुरू आहे. या अंतर्गत आज सिल्लोड कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुनयेथे दोन दिवसीय राज्यस्तरीय जंगी शंकर पटाला सुरुवात झाली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते श्रीफळ फोडून शंकर पटाचे उद्घाटन झाले.
शंकर पटाच्या पहिल्या दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह विविध राज्यातील बैल जोडी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अनेक दिवसानंतर सिल्लोड येथे जंगी शंकरपट होत असल्याने शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड संख्येने उपस्थिती पहायला मिळत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने याठिकाणी शेतकरी व आलेल्या जनावरांसाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले आहेत. शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक जवळील नॅशनल मेडिकल कॉलेजच्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या ( दि.10 ) मंगळवार रोजी दिवसभर शंकर पटाचा थरार पाहता येणार असून गुणानुक्रमे विजेत्या बैल जोडीला सायंकाळी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय शंकर पटाच्या उद्घाटन प्रसंगी यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, गटनेता नंदकिशोर सहारे, बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी केशवराव तायडे, देविदास पा. लोखंडे, किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, डॉ. दत्ता भवर , पांडुरंग दुधे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ ,रउफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, सत्तार हुसेन,आसिफ बागवान, मोहमद हनिफ, मोईन पठाण, विजय खाजेकर, मुश्ताक देशमुख, सुरेश आहेर, हाजी शेख आयुब,
No comments:
Post a Comment