Monday, 9 January 2023

लोकविकास बँकेत अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दणदणीत विजय !

लोकविकास बँकेत अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दणदणीत विजय !

*संस्थापक पॅनलचे १६ पैकी १५ उमेदवार बहुमताने विजयी* 

*एकनाथ जाधव यांच्या उत्कर्ष पॅनल चा धुवा*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ९ : लोकविकास बँकेच्या संचालक मंडळासाठी नुकतीच (दि. ८ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. आज ९ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला असून लोकविकास बँकेच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी विरोधी पक्ष नेते मा.अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या पॅनलचा दणदणीत विजय झाला असून संचालक मंडळासाठी संस्थापक पॅनलचे १६ पैकी १५ उमेदवार निवडून आले. 

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या लोकविकास बँकेच्या निवडणुकीत विरोधी उत्कर्ष पॅनल चा अक्षरशा धुवा उडाला. संस्थापक पॅनल मधील जे के जाधव, सौ अनुराधा अंबादास दानवे, माजी आमदार नामदेव पवार, प्रशांत देसरडा, बद्रीनाथ ठोंबरे, विजय खाचने, भाऊसाहेब काळे, श्रीमंत उकिरडे, विनायक गवळी, माधव जेवूघाले, मुरलीधर जगताप, गणेश नागरे, दीपक अहिरे, विक्रांत जाधव, उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...