Saturday, 7 January 2023

सिल्लोड महोत्सवात दर्पण दिन साजरा !

सिल्लोड महोत्सवात दर्पण दिन साजरा ! 

औरंगाबाद दि ७ : सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत क्रीडा महोत्सवात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज , नगरसेवक रउफ बागवान यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...