Saturday, 7 January 2023

ऑरीक सिटीतील "ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो" ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली भेट !

ऑरीक सिटीतील "ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो" ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली भेट !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ७ :- ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो- २०२३ मराठवाडा असोसिशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर (मसिआ) यांच्या वतीने ऑरीक सिटी शेंद्रा डीएमआयसी औरंगाबाद येथे आयोजित एक्स्पोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट दिली.

या एक्सपोच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर मांडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन मिळतो. त्याचबरोबर लघुउद्योजकांना नवनवीन संधी देखील उपलब्ध होतात. या माध्यमातून नवीन उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती देखील मिळते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मसीआच्या वतीने आयोजित एक्सपोला भेट दिल्यावर व्यक्त केली.

एक्सपो मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्या उत्पादनाविषयी माहिती व त्यांच्या समस्या देखील त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

या प्रसंगी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, संतोष बोर्डे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...