औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १० : हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर मा.श्री.आनंद दिघे साहेब यांच्या आर्शिवादाने व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री ना. संदिपान भुमरे यांच्या सुचनेनुसार व माझ्या नेतृत्वात राजू आहिरे, विजेंद्र जाधव, रमेश सुर्यवंशी, रामदास पवार, अमोल खडसे, यांची औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदार संघाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच डॉ. संदिप जाधव यांची शहरसंघटक (द.आ.) व शिवाजी शिरसाठ यांची उपशहरसंघटक (द.आ.) पदी नियुक्ती करण्यांत आली व महीला आघाडी सौ. शारदाताई घुले महानगरसंघटक, सौ. संगिता बोरसे पा. शहरसंघटक, सौ. रेणूकाताई गायकवाड उपशहरसंघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी औरंगाबाद मध्य मतदार संघाचे शहरप्रमुख विश्वनाथ राजपुत, गणेश पवार, रतन अहिरे, स्वप्नील शिरसाठ, संदिप आंधळे, विपीन (गुल्लु) वाकेकर, सौ. प्राजक्ता राजपुत, सौ. शारदा घुले, सौ. संगिता बोरसे, सौ. रेणुका गायकवाड, सौ. संगिता सरोदे, सौ. कल्पना साखळे पा. सौ. मनिशा रहाणे, सौ. छाया पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment