कोकण विभाग शिक्षक आमदारकीसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !
नवी मुंबई, दि.१० (ऑनलाईन वृत्तसेवा) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज कोकण भवन, नवी मुंबई येथे उपायुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी मनोज रानडे साहेब यांच्याकडे युतीचा उमेदवार म्हणून दाखल केला.
याप्रसंगी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, उद्योग मंत्री उदयजी सामंत, आमदार किसनजी कथोरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेशजी बालदी, आमदार बालाजी किनीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई पाटील, नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे, भाजपा शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे, विकास पाटील, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, आकाश तांबे, रवींद्र पालवे, अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर म्हात्रे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास सर्व मंत्र्यांनी व आमदारांनी यावेळी व्यक्त केला. 'शिक्षकांचा आमदार शिक्षकच झालाच पाहिजे' असे मत अनेकांनी व्यक्त करून ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना पाठिंबा दिलेल्या अनेक संघटनांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment