सरकारच्या विरोधात सत्य परिस्थिती मांडल्यामुळे बीजमाता' पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा माईक केला बंद, बीजमातेची सारवासारव, विद्रोही चा निषेध ?
कल्याण, (संजय कांबळे) : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा डँम जवळील कोंभळणे या दुर्गम व सोईसुविधामध्ये प्रचंड मागासलेल्या गावातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपरे या एका कार्यक्रमात बोलताना आपल्या गावाची भयानक्ता, दुर्दशा, अडचणी, समस्या, समाजासमोरील प्रश्न मांडत असताना, सरकाच्या विरोधात बोलतात, म्हणून भाषण अटोपते घेण्यास सांगत नंतर आयोजकानी चक्क माईकच बंद केल्याचा विडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यावर याचा निषेध म्हणून विद्रोही विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी संगमनेर प्रांताधिकारी यांना निवेदन दिले तर बीजमाता राहीबाई पोपरे यांना विचारले असता त्यांनी मात्र सारवासारव करत माईक बंद केला नसल्याची प्रतिक्रिया दिली. तथापि सोशलमिडियावर आता केवळ माईक बंद केला, भविष्यात सरकार विरोधात बोलल्यास गळा बंद करतील अशा पोस्ट फिरत आहेत.
अकोले तालुक्यातील कोंभळण गावच्या बीजमाता राहीबाई पोपरे यांनी भात, वाल, आदी पिकांच्या शेकडो जाती शोधून काढल्या आहेत, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती त्यांनी केली आहे. जुन ते सोनं असे म्हणत सेंद्रिय शेतीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांनी केलेल्या या अलोकिक कार्याबद्दल त्यांना शेकडो पुरस्कार मिळाले आहे.
परंतु केंद्र सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेत माझी राष्ट्रपती रामनाम कोंविद यांच्या हस्ते त्यांना मानाचा "पद्मश्री, पुरस्काराने गौरविण्यात आले होते.पण त्यांच्या कोंभळणे गावाची व परिसराची खूपच वाईट परिस्थिती आहे. रस्ते, पाणी, दिशादर्शक, इतर सोईसुविधाची पुरती वाणवा आहे, ही सत्यता मुंबई/ठाणे येथील पत्रकार संजय कांबळे यांनी बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या भेटीनंतर प्रत्यक्ष पाहणीकरुन प्राधान्याने मांडली होती.
यानंतर बीजमाता राहीबाई पोपरे यांना इंडियन सायन्स काँग्रेस अंतर्गत फार्मस सायन्स महिला विज्ञान काँग्रेस च्या उद्घाटनाच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी माझ्या गावात रस्ते नाहीत, पाणी नाही, इतर सोईसुविधा ची वानवा असल्याचे सांगितले. तसेच चंद्रकांत पाटील हे गावी येणार म्हणाले तेव्हा मी सांगितले रस्ते नाहीत, तुम्हाला हेलीकॉप्टर ने यावे लागेल, त्यांनी माझ्या घराजवळ हेलिकॉप्टर उतरवले व आले असे बोलत असतानाच आयोजकातील एक महिला त्यांच्या जवळ येवून भाषण आटोपते घ्या असे सांगत त्या बोलत असताना त्यांचा माईकच बंद केला, हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
त्यामुळे एका आदिवासी महिलेचा अपमान झाला, हा अपमान पद्मश्री सन्मानाचा आहे असा आरोप करत विद्रोही विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी या आयोजकांचा निषेध करत तसे निवेदन संगमनेर चे प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.या बाबतीत बीजमाता राहीबाई पोपरे यांना विचारले असता त्यांनी सारवासारव केली.एकूणच या सर्व प्रकाराचा लोकांनी गंभीरतेने विचार करायला हवा अन्यथा 'विरोध' हा शब्दच शब्दकोशातून नाहिसा होईल.
प्रतिक्रिया
*बीजमाता राहीबाई पोपरे - मी सत्य परिस्थिती मांडली, मी विविध कार्यक्रमाला जाते तेव्हा गावाच्या, परिसराराच्या समस्या, अडचणी, प्रश्न मांडा असे ग्रामस्थ सांगतात म्हणून मी मांडले, पण माईक बंद केला नाही, मी मोदींचे नाव पण घेतले नाही,
*कुमार भिंगारे (जिल्हाध्यक्ष) विद्रोही विद्यार्थी संघटना,
-आम्ही निषेधार्थ निवेदन दिले आहे, तसेच लवकर राजूर व राहुरी येथे निषेध सभा घेणार आहोत.
*महेश तपासे (प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) - सत्य बोलणे चुकीचे आहे का? सत्तेतील सरकारने आपले कान डोळे उघडे ठेवून काम करायला हवे, कोणी बोलत असताना माईक बंद करणे म्हणजे जनतेचा आवाज बंद करणे होय.
*स्वप्नील धांडे (सहसचिव, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) - बीजमाता राहीबाई पोपरे या सत्य बोलण्यात परिसरात परिचित आहेत, सत्तेवर असलेल्या लोकांचा हा सांस्कृतिक मागसलेपणा आहे, यांना केवळ बहुजन, दिन दलित मिरविण्यासाठी हवेत.
No comments:
Post a Comment