Friday, 27 January 2023

उद्या दामोदर नाट्यगृहात साजरा होणार "कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा "हिरक महोत्सव" सोहळा !

उद्या दामोदर नाट्यगृहात  साजरा होणार "कलगी-तुरा समाज उन्नती मंडळाचा "हिरक महोत्सव" सोहळा !

ठाणे, उदय दणदणे -

गेली सहा दशक कोकणातील कलगी-तुरा (शक्ती-तुरा) लोककलेचं जतन संवर्धन करण्याबरोबरच शाहिरी कलाकारांच्या उन्नतिसाठी सदैव कार्यरत असणारी "कलगी-तुरा" समाज उन्नती मंडळ (मुबंई) संस्थेला, ६० वर्ष पूर्ण होत असून संस्था ६१ व्या वर्षात अभिमानास्पद पदार्पण करत आहे.गौरवशाली परंपरा असणाऱ्या कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ - मुबंई, (महाराष्ट्र) या संस्थेचा "हिरक महोत्सवी वर्ष" रविवार, दिनांक -२९ जानेवारी- २०२३ रोजी, रात्रौ -८ वा. दामोदर नाट्यगृह परेल (मुंबई) येथे सन्मा.आमदार- भरतशेठ गोगावले, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सन्मा.आमदार उदय सामंत (रायगड- रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य), शालेय शिक्षण मंत्री सन्मा.दिपक केसरकर  मा. प्रमोद गांधी- ( उद्योजक /समाजसेवक ), मा.विठ्ठल चिविलकर- (चेअरमन- कुणबी बँक), मा.भूषण बरे (कुणबी समाजोउन्नती संघ), मा.जितेंद्र सावंत- (सदस्य- रा. जि. प.) मा.सुशांत जाबरे- (उद्योजक), मा.इकबाल चांदले- (महाड तालुका संपर्क प्रमुख), मा. एकनाथ सुकुम- ( महाड तालुका- सहसंपर्क प्रमुख- शिवसेना-शिंदे गट,) अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

सदर "हिरक महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेला आणि विशेषतः कलगी-तुरा लोककलेला योगदान देणाऱ्या महान आणि जेष्ठ शाहिरांना "कलगी-तुरा कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर सोहळ्यानिमित्त उपस्थितांच्या मनोरंजनार्थ "भेदीक शाहिरी" सादरकर्ते -शाहीर तुषार पंदेरे तसेच "तमाशा"-सादरकर्ते शाहीर अनंत माळी याचे शिष्य-  सुनील, महेंद्र सह प्रकाश ,रामचंद्र आणि मंडळी "कलगी-तुरा" ( जाखडी नृत्य) सादरकर्ते-शाहीर मधुकर यादव व शाहीर प्रकाश पांजणे अशा त्रिवेणी लोककलांचे सादरीकरण होणार असून मातृसंस्थेच्या "हिरक महोत्सव" सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून ह्या आनंदी सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे असे आवाहन उपरोक्त संस्थेचे सरचिटणीस- संतोष धारशे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...