शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि. ५ : सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांसह कृषी विभागाने सादर केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय व आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेती केली पाहिजे असे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
सिल्लोड येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. कृषिमंत्री . अब्दुल सत्तार यांच्यासह ना. विखे पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनास भेटी देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी व माध्यमांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दापोली, अकोला, राहुरी, परभणी या चारही कृषी विद्यापीठाच्या दालनासह इतर विभागांना भेटी दिल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रदर्शनातील वैशिष्ट्ये व विविध दालनांची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या वतीने पारंपरिक नृत्य सादर करून ना. विखे पाटील यांचे स्वागत केले.
*---------------------------------*
शेतकऱ्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळायला हवी. शेतकऱ्याची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलावी या दृष्टीने कृषी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देत सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
No comments:
Post a Comment