Wednesday, 4 January 2023

युथ फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर !

युथ फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे निकाल जाहीर !

मुंबई उपनगर (गणेश हिरवे/शांताराम गुडेकर) :

अभिजित राणे युथ फौंडेशन च्या वतीने संस्थेचे संस्थापक अभिजित राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा आणि वृत्तपत्र लेखन स्पर्धा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुजाता हनमघर प्रथम, वैभव पाटील द्वितीय, श्रद्धा वझे तृतीय, सुशील माळवी चतुर्थ, मनीषा कडव पंचम तर शैला वाघ, अवंतिका जाधव, संजय ठाकूर, संध्या यादवडकर, शुभांगी वाघ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले असून राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत जयराम देवजी प्रथम, मनमोहन रोगे द्वितीय, दीपक गुंडये तृतीय, मधुकर कुबल चतुर्थ, सुर्यकांत भोसले पंचम तर ज्योती टेमकर, अरुण पराडकर, शशिकांत सावंत, भूषण तांबे, रामचंद्र मेस्त्री, बाळ पंडित, माधुरी भोईरकर, मयूर ढोलम, उदय दणदणे, सीमा अवसेकर, यांना उत्तेजनार्थ आणि राज्यस्तरीय कविता स्पर्धेत डॉ. शैलजा करोडे प्रथम, शुभांगी गुरव द्वितीय, संगीता उपाध्ये तृतीय, सोनाली शिंदे चतुर्थ, विलास देवळेकर पंचम तर बबन येरम, स्नेहा गोसावी, परवेश मेश्राम, दीपाली बोहरूपी, भारती कुलकर्णी याना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. यासाठी ऋता रानडे, शिवाजी कुलाळ, भाग्यश्री रावले, योगिता हिरवे, फिलिप रोड्रिग्ज, गणेश हिरवे या शिक्षक वृंदाने परीक्षक म्हणून काम पाहिले.स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ २४ जानेवारी २०२३ रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न होणार असल्याचे स्पर्धाप्रमुख गणेश हिरवे यांनी सांगितले.

1 comment:

  1. सहभागिता ना पण प्रमाण पत्र दयावे. ..राजेश बी.गुप्ता...9653392294 व भेटणार का , मलबार हिल ..वाळकेश्वर....

    ReplyDelete

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...