सिल्लोड महोत्स्व ह.भ.प.निवृत्ती महाराज इन्दोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न !
औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि ५ : सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत शहरातील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन परिसरात ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कीर्तन सोहळा प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.*
प्रारंभी ना. विखे पाटील आणि ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला. मंत्री ना. विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधून सिल्लोड महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
सिल्लोड महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले. निवृत्ती महाराज यांना ऐकण्यासाठी महिला पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर मुर्डेश्वर संस्थानचे महंत ओंकारगिरी महाराज, शेलगाव संस्थानचे महंत दयानंद महाराज, महंत शास्त्री महाराज मंगरूळकर आदी साधू संतांसह सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, वारकरी संप्रदायाचे कृष्णा लहाने, ह.भ.प.कमलाकर पिंगाळकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, अर्जुन पा. गाढे, श्रीराम पा. महाजन, केशवराव तायडे, राजेंद्र ठोंबरे, दामूअण्णा गव्हाणे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, न.प.तील गटनेता नंदकिशोर सहारे, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील , शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, रतनकुमार डोभाळ, राजू गौर, मनोज झंवर आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment