Wednesday, 4 January 2023

आम्ही नगरकर मुंबई संघचे कार्य कौतुकास्पद - माजी आमदार नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम)

आम्ही नगरकर मुंबई संघचे कार्य कौतुकास्पद - माजी आमदार नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम)

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण मधील आम्ही नगरकर मुंबई संघ च्या शिष्टमंडळाने कल्याण पश्चिम माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेत आम्ही नगरकर मुंबई संघ दिनदर्शिका २०२३ सादर केली नुकतेच नवी मुंबई नेरूळ येथे या दिनदर्शिकेचे प्रकाशन व स्नेहसंमेलन संपन्न झाले आहे.  नोकर,व्यवसाय,वधु वर परिचय, वैद्यकीय सेवा यासाठी आम्ही नगरकर मुंबई संघ प्रयत्नशील आहे अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. कमी वेळात केलेलं हे  कार्य कौतुकास्पद असून कार्याला नेहमीच सहकार्य राहील अशी भावना कल्याण पश्चिम माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली. 

आम्ही नगरकर मुंबई संघ च्या माध्यमातून नजिकच्या काळात कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, ठाणे, घाटकोपर येथे व्यवसाय मार्गदर्शन, वधु वर सूचक मेळावा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या माध्यमातून स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा मानस आहे अशी भावना शिष्टमंडळाने व्यक्त केली तसेच आधारवाडी जेल मुख्य अधिक्षक अंकुश सदाफुले साहेब यांनाही 'आम्ही नगरकर मुंबई संघ दिनदर्शिका २०२३' सादर करण्यात आली यावेळी मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, तानाजी करपे, बाळासाहेब हांडे, रविकिरण भोसले, बाळासाहेब गुंजाळ, बजरंग ढोकरे, संतोष हंडाळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...