तांदळाच्या नऊ जातीचे जनक "दादाजी खोब्रागडे" यांचा "इंडियन साइंस कांग्रेस" ला विसर !
नागपुर, अखलाख देशमुख, दि ५ : सध्या महाराष्ट्रात आणि विशेष करुण विदर्भातील नागपुर मधे "इंडियन सायन्स कांग्रेस" सुरु आहे परंतु विदर्भातील एक संशोधक ज्याची दखल "फोर्ब्स" ने घेतली ते धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांची दखल घेण्याची गरज विदर्भात होऊ घातलेल्या इंडियन सायन्स कांग्रेस ला वाटली नाही ...
एचएमटीसह तांदळाच्या 9 जातींचे जनक, जागतिक कीर्तीचे संशोधक_दादाजी_खोब्रागडे. घरातील कोपरा नि कोपरा दारिद्रयाने व्यापला असताना, स्वता उपाशी राहून या अन्नदात्याने गरीबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतला. कमालिची उपेक्षा, हेटाळणी, पदोपदी आलेला अपमान सहन करीत दादाजींनी आपला ध्यास कधी ढळू दिला नाही.
दादाजींच्या संशोधन उद्योगशीलतेची अमेरिकेच्या ‘फोर्ब्स’ने दखल घेतली पण आपण मात्र या महान संशोधकाची कदर करण्यात कमी पडलो.
No comments:
Post a Comment