हे सरकार वेंटिलेटर -:खा.संजय राऊत
शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्याचे बीज बाळासाहेबांनी रोवले. महावृक्ष फोफावतो, वाढतो. पाचोळा पडतो. कचरा पडतो तो कचरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वेचून नेला जातोय. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. कचरा आग लावण्यासाठी असतो. या कचऱ्याचा धूर फार काळ राहत नाही.
सरकार व्हेटिंलेटरवर असून ते सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम होईल. कुणी त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना सामोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय.
चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. २०२४ ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव येईल वाटत नाही. संविधान, घटना आणि कायदा याचे उल्लंघन करणारे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही.
वृत्तांकन - अखलाख देशमुख
No comments:
Post a Comment