कल्याण येथील कोकण महोत्सव साठी आमदारांनी केली सढळ हस्ते मदत !
"कोकण संस्कृती ला प्रोत्साहन देणे हेच उद्दिष्ट"
कल्याण, नारायण सुरोशी : कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान कल्याणच्या वतीने यंदा १३ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन कल्याण पूर्वमधील पोटे मैदान, कोळशेवाडी येथे करण्यात आले आहे.
२२ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात राज्यातील सर्वपक्षीय नेते हजेरी लावणार आहेत. कल्याण पूर्वमधील पोटे मैदानामध्ये दररोज सायंकाळी ६ ते १० काळात कोकणातील आणि स्थानिक विविध प्रसिद्ध कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाला कल्याण पुर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड, उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी, कल्याण ग्रामीण चे आमदार राजु रतन पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून प्रत्येकी पाच लक्ष रुपयांची मदत दिली असून कोकणातील संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्याचे सांगितले तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे, यांनी सांगितले या महोत्सवात कोकणी कला-क्रीडा, खाद्य संस्कृती, उद्योग आणि पर्यटन यांनी भरगच्च असा दहा दिवस चालणारा हा कार्यक्रम कल्याणकरांसाठी पर्वणी असते. यावेळी कार्याध्यक्ष सुभाष म्हस्के, उपाध्यक्ष उत्तम पवार, सचिव संदीप तांबे, खजिनदार संतोष परब, सहसचिव दीपक गायकवाड, उपखजिनदार संतोष गुरव तसेच पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment