Sunday, 8 January 2023

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आजोबा शरद पवार नंतर आता रोहित पवार !

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आजोबा शरद पवार नंतर आता रोहित पवार !

भिवंडी, दि,९, अरूण पाटील (कोपर) !
          ज्ञराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणा सोबत क्रिकेट जगतात तितकेच सक्रीय असतात. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सदस्य पदाच्या निवडणुकीत क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.
           महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकी नंतर रविवारी पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोसिएशनच्या कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत  यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्या या निवडीमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पवार पर्व सुरु झाले आहे.
        रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल एमसीए (MCA) च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे  यांचा पाठिंबा. तसंच MCA चे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली.
          उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर खजिनदार संजय बजाज  व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान  यांचंही मोठं सहकार्य लाभलं.
         क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...