स्वराज्य कोकण कलामंच मुंबई यांचे १४ जानेवारी २०२३ रोजी साहित्य मंदिर नाट्यगृहात नमनाचे आयोजन !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
कोकणातील लोककलेचा दागिना जोपासण्याचे काम कोकणातील अनेक नामवंत मंडळे, कलामंच, कोणताही खंड न पाडता सातत्याने करत आहेत अश्या नमन मंडळांना कलामंचाना कलाकारांना, नृत्यांगनाना, शाहिरांना, संगीतकारांना, साहित्यिकांना, लेखक, दिग्दर्शक, गीतकार यांना स्वराज्य कोकण कलामंच मुंबईचा मानाचा मुजरा, कोरोनाच्या पाश्वभूमीनंतर पुन्हा एकदा हिच लोकप्रिय लोककला स्वराज्य कोकण कलामंच मुंबई पुन्हा एकदा एक पाऊल कलाक्षेत्रात टाकून मुंबई रंगमंचावर घेऊन येण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.
त्यासाठी आपली सर्वांची साथ असेल यामध्ये तिळमात्र शंकाच नाही. नांदी नव्या पर्वाची या ब्रीद वाक्याने कलाक्षेत्रात पर्दापण केलेला (स्वराज्य कोकण कलामंच मुंबई) प्रस्तुत स्त्री पात्राने नटलेली कोकणची वैभवशाली लोककला (नमन) श्री गणेशाची भक्तीमय आराधना पारंपरिक बाज असणारी नटखट (कृष्णलिला)त्यामध्ये मनमोहुन टाकणाऱ्या कलानृत्याविष्कार करणाऱ्या शृंगारिक गौळणी, मावशीबाईचा दिमाखदार प्रवेश, पेंदया, सुदाम आणि बोबडया यांचा विनोदी तडका आणि राधाकृष्ण यांची रासलीला तसेच संगीत सुस्वरांनी मन प्रसन्न करणारी सुप्रसिद्ध शाहीर प्रकाश पांजणे यांची गीतरचना आणि पार्श्वगायन खास आकर्षण शाहीर संदेश ओकटे यांचे व ढोलकी, मृदुंग वादन, बेंजो मास्टर कु.अमोल नानिस्कर यांचे संगीत, स्वप्नील गुरव यांचे आटोपँड, आणि कु.श्वेता घडशी यांचे पार्श्वगायन श्री रवींद्र नाचरे बुवा यांची अनमोल साथ आणि त्याला साजेसे कु.चेतन मोहिते आणि कु.सोनाली शिंदे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे.
सोबतच कलाकरांचे जीवन. आणि कलाकारांची व्यथा सांगणारी एक विचार विनिमय करायला भाग पाडणारी अंगावरती शहारे आणणारी नाट्यकलाकृती."आम्ही रंगकर्मी" "व्यथा कलाकारांच्या..."लेखक - श्री.राजेश गंगाराम येद्रे,दिग्दर्शक - संदेश महादेव येद्रे, सहदिग्दर्शक श्री.संतोष येद्रे,बंदिश अवेरे निर्माते नरेश येद्रे,दिपक मांडवकर अशी मंडळी आहेत.तर मंडळी रंगकर्मींच्या काय असतील हो व्यथा? तुम्हाला ऐकायच्या आहेत ना? काय असतील त्यांच्या गाथा? कोण आहे का कलाकारांचा वाली? राक्षसरुपी मोबाईलमध्ये माझा सारा रसिकवर्ग अडकुन पडलाय त्याला कोण वाचवणार? कलाकारांनी डोळ्यातील पाणी आम्ही आटवले परी रसिका तुम्हांस मात्र हसवले... भल्याभल्यांनी आम्हास दुखावले परी चेहऱ्यास रंग लावून नटवले.असे अनेक प्रश्न आपल्याला विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.तरी हा शुभारंभ प्रयोग साहित्य मंदिर नाट्यगृह मुंबई रंगमंचावर शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ठिक ८:३० वाजता होणार असून असा हा नयन रम्य सोहळा पाहायला विसरू नका असे आवाहन स्वराज्य कोकण कलामंच मुंबई यांनी केले आहे. तिकीटासाठी श्री. संदेश येद्रे- ९९२०९९७७३४, श्री.संतोष येद्रे- ८९२८६१६३४४, सिद्धेश- ९९७५०२११६७ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment