कॉम्रेड सुभाष लांडे यांचे जळगाव येथील सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मजबूत करण्याचे आवाहन !
जळगाव, प्रतिनिधी... देशात भारतीय जनता पक्ष, आर एस एस हे सरकार जातीधर्मात कटूता वाढवत आहे, जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे, त्याचप्रमाणे त्या सरकारच्या धोरणामुळे सर्व शेतकरी कष्टकरी वर्ग यांचीच पिळवणूक होत आहे. अदाणी, अंबानी या दोनच उद्योगपतीनी देशाची अर्थव्यवस्था काबीज केली आहे व तेच श्रीमंत बनत आहेत. जनतेमधील नाराजीला छेद देण्यासाठी मोदी सरकार राम मंदिर या मुद्द्याला जास्त प्राधान्य देत आहे. नाहीतर राम राम म्हणणे हे प्रत्येक भारतीयाच्या वळणी पडलेले असून त्यातून सद्भावना दिसून येते या सद्भावनाचा सामाजिक राजकीय पायाच मोदी सरकार उधवस्त करीत आहे. त्यामुळे जनता पर्याय शोधत आहे, त्यासाठी श्रमिक जनतेचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मजबूत करण्याचे आवाहन कॉम्रेड सुभाष लांडे यांनी जळगाव येथे बळीराम पेठेत झालेल्या पक्षाचे विस्तारित बैठकीत केले. या बैठकीला पक्षाचे माजी राज्य सचिव कांबळे तुकाराम भस्मे यांनी सांगितले की येत्या 2024 साली मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी तमाम जातीवादी विरोधी पक्षांची एकजूट होणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यासाठी डावा लोकशाही पर्याय हा जरी विश्वासार्ह वाटत असला तरी आघाडी मजबूत करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे, गेल्या नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर किसान सभा शेतमजूर युनियनतर्फे अलग दोन मोर्चे नेलेत, त्यात हजारो लोकांचा सहभाग हा आपल्यावरील विश्वासाचे द्योतक आहे, जळगाव जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्षाच्या राष्ट्रीय महाधिवेशन ने घेतलेल्या निर्णय नुसार सभासद संख्या वाढवावी असे आवाहन केले.
राष्ट्रीय कंट्रोल कमिशनचे सभासद काँ राम बाहेती यांनी गेल्या चोपडा येथील जिल्हा अधिवेशननंतर राज्य व राष्ट्रीय अधिवेशन ची सविस्तर माहिती सविस्तर माहिती दिली व सक्रिय कार्यकर्त्यांचं कौन्सिल असणं आवश्यक आहे, अशी गरज प्रतिपादन केली या बैठकीचे अध्यक्षस्थानी भुसावळ येथील कामगार नेते काँ राजेंद्र झा उपस्थित होते, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. का अमृत महाजन यांनी कोरोना काळातील पक्ष कामे.. विविध आंदोलनातील भागीदारी बाबत मार्गदर्शन केले या बैठकीत कुरहे खु ता अमळनेर येथील सरपंच नीला बाई भील यांचा कामरेड लांडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला का देविदास बोंदार्डे., जे डी ठाकरे यांनी सम योचीत विचार मांडले या बैठकीत पक्षाचे काम सुरळीत का ज्ञानेश्वर पाटील का महाजन का ठाकरे का बोंदर्डे का गोरख वानखेडे लक्ष्मण शिंदे का. झा या सात काम्रेड चे सचिव मंडळ व त्यांचे सह ३१ काम्रेड ची तात्पुरती समिती निवडण्यात आली येत्या २० फेब्रुवारी शहीद का गोविंद पानसरे यांचे मारेकरी यांना शिक्षा देणेस विलंब का? जबाब दो मोर्चा राज्यभर कलेक्टर कचेरींवर काढणार १००० पक्ष सभासद नोंदणार ५०००० ₹ पक्षनिधी गोळा करणार असेही निर्णय घेण्यात आले या बैठकीला का अरुणा काळे. सुमती वारके, वाल्मीक मैराळे चंद्रकांत माळी, प्रल्हाद एरंडे, मंदा मोरे शफी उद्दिन सलौद्धिन मोरे शांताराम पाटील आदींसह ५० कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.
No comments:
Post a Comment