पत्रकार दिनाच्या महापौरांनी दिल्या पत्रकारांना शुभेच्छा !
जळगाव, अखलाख देशमुख, दि ६ : मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य इतिहास संशोधक आचार्य बाळशास्री जांभेकर यांची जयंती अर्थात पत्रकार दिनानिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रसंगी प्रथम नागरिक तथा महापौर तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका ,जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी महापौर सौ.सीमा भोळे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशाली सुर्यवंशी, उद्योजक रजनीकांत कोठारी, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत प्रमुख पाहूणे म्हणून तर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लसीकरण करण्याचाही मान्यवरांनी संदेश दिला. जिल्ह्यातील पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते. उत्तम कामगिरी बजावणाऱ्या महिला पत्रकारांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment