Monday, 23 January 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश !

मुंबई, प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, मानवत येथील ८४ सरपंचानी आमदार संतोष बांगर आणि जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या पुढाकाराने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याशिवाय बीड, साळेगाव आणि ठाणे ग्रामीण पट्ट्यातील पालघर, शहापूर, मुरबाड, जव्हार, वाडा येथील विविध राजकीय पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील आज पक्षप्रवेश केला. 

यासोबतच पालघर जिल्ह्यातील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भरत शिंदे आणि मुरबाड, शहापूर, वाडा, मोखाडा, पालघर येथील असंख्य कार्यकर्त्यांनीदेखील यावेळी पक्षप्रवेश केला. 

राज्यात युती सरकार स्थापन झाल्यापासून केलेली विकासकामे पाहता राज्यभरातील विविध पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांनी पक्षावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू तसेच ग्रामीण पातळीवरील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासकामांसाठी नक्की निधी देऊ असे सांगून आश्वस्त केले. 

याप्रसंगी आमदार संतोष बांगर, माजी खासदार ॲड.सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव संजय म्हशीलकर, बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...