Monday, 9 January 2023

"मराठा आरक्षण' गोलमेज परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न.!

"मराठा आरक्षण' गोलमेज परिषद अतिशय यशस्वीरित्या संपन्न.! 

*गोलमेज परिषदेमध्ये घेतले विविध 16 ठराव*

जालना, अखलाख देशमुख, दि ९ :  मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्हयाच्या वतीने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या राज्यातील विविध संघटना - अभ्यासक व सामान्य कार्यकर्ता आदी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद दि. 08 रोजी जालना शहरातील मातोश्री लॉन्स, अंबड रोड, जालना येथे संपन्न झाली. यावेळी या गोलमेज परीषदेमध्ये विविध ठराव घेण्यात आले ते पुढील प्रमाणे.

1. मराठा समाजाला आरक्षणाविषयी न्यायालयापुढील पुनर्विचार याचिका सकारात्मक निकाली लावून घ्यावी. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने जी तत्परता ओबीसी राजकीय आरक्षणात दाखविली तशीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी व प्रसंगी 11 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालवून सकारात्मक निर्णय निकाली लावावा.

2. मराठा आरक्षणासाठी तातडीने  मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री उपसमीती अध्यक्ष- सदस्य आणि समन्वयक - अभ्यासक यांची लाईव्ह बैठक लावावी
.
3. निजाम स्टेटमध्ये मराठा समाज कुणबी-मराठा आरक्षण लागू होते त्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजाला पूर्वीप्रमाणे कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत.

4. राज्यात ओबीसीचे 38% आरक्षण आहे हे माजी मुख्यसचिव जयंत बांठीयां यांच्या कमीटीने दाखवून दिले आहे म्हणून तातडीने राज्यातील आरक्षण दुरुस्त करून ओबीसी आरक्षण 19 टक्के निश्चित केले तर राहीलेले 27 पैकी 09% आरक्षण मराठा समाजाला तातडीने राज्य सरकारच्या अधिकारातून द्यावे.

5. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज  महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच इतर बहुजन महामानवांची बदनामी थांबवावी.

6. महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने हटवावे.

7. अण्णासाहेब पा. मागास आर्थिक विकास महामंडळामार्फत 'थेट कर्ज योजना मंजूर करावी.

8. सारथीचे उपकेंद्र औरंगाबाद येथे चालू करावे व प्रत्येक जिल्हयात वसतिगृह उभारावे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता त्वरीत व वाढीव द्यावा.

9. मुंबई येथील शिवस्मारक राजभवनावरील जमीनीवर'च उभारावे.

10. मराठा व सर्व जातनिहाय जनगणना करावी.

11. भगतसिंह कोश्यारी' औरंगाबाद व नांदेड येथे विद्यापिठात किंवा मराठवाड्यातील कार्यक्रमासाठी येणार त्यादिवशी तेथे शिवभक्तांकडून कडकडीत बंदचे आयोजन करावे. राज्यपालांचे कार्यक्रम सनदशीर मार्गाने कडकडीत बंद आंदोलन करून होऊ न देण्याचे जनतेस आवाहन.!

12. सारथीमधील तारादूत प्रकल्प चालू करण्यात यावा व अन्य प्रकल्पाला गती दयावी.

13. किल्ले संर्वधनासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचा निधी तेथे द्यावा.

14. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न व इतर मागण्याबाबत राज्यात निर्णय होत नसेल तर राज्यातील मराठा समाज दिल्लीमध्ये धडकणार.

15. चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या पदावरून हकालपट्टी करावी.

 16. कोपर्डी येथील पीडीत ताईच्या मारेकऱ्यांना त्वरीत फाशी दयावी.

यावेळी या परिषदेला माझ्यासह_ राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, चंद्रकांत भराटसर  मनोज आखरे, रमेश केरे, रवींद्र पाटील, जगन्नाथ काकडे, संतोष गाजरे, अरविंद देशमुख, संदीप ताडगे, अशोक पडूळ, सदाशिव भुतेकर, शुभम टेकाळे, योगेश पाटील, राम कुऱ्हाडे, भागवत, प्रा. राजेंद्र भोसले, भरत मानकर, सुभाष कोळकर, ज्ञानेश्वर ताकट, शिवानंद भानुसे, सुनिल खोतकर, युवराज सुर्यवंशी, संजय काळे, मनोज जरांगे, काकडे पाटील, गणेश पाटील, विष्णु जानकीराम, विनेदकुमार देशमुख, डॉ. प्रशांत, जिगे, दिलाने गायकवाड, राजेंद्र पारीक, चंद्रसेन कोठावळे, सखाराम बोडखे, विश्वास बच्चे, यशवर्धन ताडे, रामेश पाइक, सुभाष  चव्हाण, रामकिसन राऊत, विजय काकडे, बालासाहब कदम, अँड शैलेश देशमुख, सदाशिव भूलकर, शुभम ऐकल, विकास पाटील, योगेश बहादुर, बालाजी माने, समाधान खंदारे, देशमुख, दतात्रय कदम, अशोक खानापुर, गणेश लोखंडे, सौ. प्रभावती पवार, शाम पाटील, प्रताप  लहाने, डवळे पाटील, विश्वनाथ जाधव, राजेंद्र गोरे, सुरेश वाकडे,  प्रा. चंद्रकांत आदींसह राज्यभरातील समन्वयकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...