थोर समाज सुधारक पहिल्या मुस्लीम शिक्षीका फातेमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, ९ : दिनांक ०९/१/२०२३ रोजी भारताच्या पहिल्या थोर समाज सुधारक पहिल्या मुस्लीम महिला शिक्षीका फातेमा शेख यांच्या जयंती निमीत्त्त रोशनगेट येथे मोहसीन अहमद खान यांच्या शाळेमध्ये अभिवादन करुन यावेळी फातेमा शेख यांच्या जयंती चे औचित्य साधुन त्यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कारासह सन्मानचिन्ह प्रमाणपत्र औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांच्या हस्ते देण्यात आले व कार्यकमामध्ये महाराष्ट्र सरकारने फातेमा शेख यांच्या नावाने शिक्षक पुरस्कार जाहीर करावा असा ठराव मांडण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेले शिक्षकांचे नावे प्रा.प्रकाश वाघमारे, प्रा.योगेश निकम, डॉ.शाहीन फातेमा, खान रईसा बेगम, अयुब खान, शाकेरा बेगम, सय्यद शफि, शेख सकीना अफरीन या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. कार्यकमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक मोहसीन अहमद खान होते. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर, अनिस पटेल, महेंद्र रमंडवाल, आकेफ रजवी, कैसर बाबा, अनिल माळोदे, आसमत खान, शेख रईस, मंजु लोखंडे, सचिन लोखंडे, सलीम खान, सय्यद फयाजोददीन, राजशेखर साळवे, उमर सौदागर आदी उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचान खान मोहम्मद यासेर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिस पटेल यांनी केले.
No comments:
Post a Comment