Friday, 10 February 2023

१२ फेब्रुवारी पासुन 'पूर्वरंग' हे विषेश कार्यक्रम !

१२ फेब्रुवारी पासुन 'पूर्वरंग' हे विषेश कार्यक्रम ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १० : वेरुळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सव या वर्षी दि. २५, २६,  २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची सुरुवात ‘पूर्वरंग’ या विशेष कार्यक्रमाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ पासून होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे पूर्वरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सोनीया परचुरे व संच सुप्रसिध्द बॅले नृत्य सादर करणार आहेत. तसेच सांज अमृताची हा मराठी व हिंदी गाणी, सुफीगाणी यांचा कार्यक्रम गायक शाल्मली सुखटनकर, आशिष देशमुख, मंदार आपटे व माधुरी करमरकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा औरंगाबाद शहरवासीयांनी तसेच सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...