Thursday, 9 February 2023

श्री.जाकादेवी झांजगी नृत्य नमन मंडळ, रावारी यांच्या नमनाचा प्रयोग आधीच हाऊस फुल्ल !

श्री.जाकादेवी झांजगी नृत्य नमन मंडळ, रावारी यांच्या नमनाचा प्रयोग आधीच हाऊस फुल्ल !

मुंबई ( निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर )

            कोरोनो काळात ठप्प पडलेले जीवनमान पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले, कोकणातील पारंपरिक लोक कला जपणारे नमन पुन्हा सुरु होताच रसिक जनात नवीन  आशा निर्माण होऊ लागल्या. गेल्या अनेक शतके आपल्या कोकणातील मातीतील हा वारसा संवर्धन करणारे  रत्नागिरी जिल्हातील लांजा तालुका मधील सुप्रसिद्ध पौराणिक गणनाट्यची जोड असणारे, श्री जाकादेवी झांजगी नृत्य नमन मंडळ, रावारी सर्वत्र हवे हवे वाटणारे खेळे आता अभिलाषा क्रीएशन मुंबई मार्फत रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 8.00 वाजता आपल्या कोकणातील सर्व कलाकारांचे हक्काचं रंगमंच अर्थात दामोदर हॉल परेल (प्रभादेवी) येथे आयोजित करण्यात आला आहे. या विशेष म्हणजे विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान रावारी (मुंबई ) हा प्रयोग हाऊस फुल्ल करणार यात काहीच शंका नाही आणि जवळजवळ हाऊस फुल्ल झालाच आहे. पारंपरिक शृंगारिक गौळणसहित, संगीतमय गण, वगनाट्य यमाचे गर्वहरण आणि विनोदी फारसा पटली रे पटली पांड्याला रंगीं पटली असा रसिकांसाठी मनोरंजनाची परवणीच ठरणाऱ्या नाट्य प्रयोगाचा अनुभवी व उत्तम व्यवस्थित जोड. ह्यामध्ये लेखक श्री. मनोहर घडशी, दिग्दर्शक श्री. नितेश आगरे, शुभम डांबरे, निर्माता जाकादेवी ग्रामविकास मंडळ रावारी, गायक सुशांत बाणे, संदेश आगरे कलाकार रावारी गावचे यशस्वी कलाकार यांच्या सोबत असणाऱ्या यासंपूर्ण टीमला खूप खूप  शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...