श्री केदारनाथ राजवाडी आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
मुंबई ( शांताराम गुडेकर/दीपक कारकर )
संगमेश्वर तालुक्यातील श्री केदारनाथ राजवाडी आयोजित भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन दि.४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी केले होते. ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात उत्सहात पार पडली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला जय हनुमान कळबस्ते, चिपळूण तर द्वितीय पारितोषिक मैत्री कडवई, तृतीय पारितोषिक तांबडवाडी कडवई,चतुर्थ पारितोषिक जय हनुमान कळबस्ते, चिपळूण आदी संघांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. दिलीप मधुकर गुरव, उपसरपंच राजवाडी, प्रमुख उपस्थिती मा.जि.प. अध्यक्ष श्री. संतोष थेराडे तसेच मा.जि.प. सदस्य श्री. शंकर भुवड तसेच कडवई गावचे मा. सरपंच श्री. वसंत उजगावकर, स्वराज्य संस्था अध्यक्ष अविनाश गुरव तसेच नंदकुमार मांजरेकर मा.सरपंच राजवाडी, मा.सरपंच विजयराव सुर्वे, अरविंद सुर्वे, प्रमोद बाईत, नरेश गुरव, प्रदीप भडवलकर, दीपक बाईत. राजन गुजर, विश्वास मांजरेकर, शंकर भडवलकर, सर्वेश सुर्वे, स्वस्तिक गुरव, दीप गुजर, साहिल मांजरेकर, हर्ष गुजर, सुमित सुर्वे, ओंकार मांजरेकर, पारस बाईत, आयुष भडवळकर, यश भडवळकर, साईराज सुर्वे आणि सर्व राजवाडी ग्रामस्थ, मुंबई आणि महिला मंडळ यांच्या अथक परिश्रमातून स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment