आज दादरच्या छ.शिवाजी महाराज नाट्यमंदिरात "देहदान" नाटकाचा प्रयोग !
मुंबई,( दीपक कारकर/शांताराम गुडेकर) :
जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत आपण आपल्या देहावर अधिकार गाजवतो पण मृत्यूनंतर आपल्या देहाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतोच याच उत्तर आपल्या जाणून घ्यायचं असेल तर लेखक सागर पालवकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक सूर्यकांत पेजे यांच्या दिग्दर्शनातून दोन अंकी नाट्यकृती "पंचऋशी सहकार मंडळ" संलग्न पंचऋषी उन्नती मंडळ भातगाव तिसंग ( डिंगणकरवाडी ) ता. गुहागर जि.रत्नागिरी आयोजित शैक्षणिक मदतीकरिता एक सामाजिक व कौटुंबिक नाटक "देहदान" आज शुक्रवार दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ०८:०० वा छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर (प.) येथे आयोजित केले आहे.
रक्त, जात, पात धर्म मानत नाही, खरतर मानवता हाच एकमेव धर्म आहे, तसेच या देहाचे आहे, समुद्राचा किणारा जसा समुद्राची मर्यादा दर्शवतो, तसेच मानवाच्या जिवनात देखील काही घटक आहेत. त्यातील एक घटक म्हणजे आपण देहदान म्हणू या. प्रत्येक माणसाचे जीवन एक कोरं करकरीत पुस्तक त्यातील एखादं पान आपण देहदान करून सार्थकी लावूया, असा अनमोल संदेश देणारी ही नाट्यकृती पाहणे प्रेक्षकांना पर्वणीच ठरणार आहे. या नाट्यप्रयोगाला सहपरिवार सह कुटुंब उपस्थित राहून शैक्षणिक मदतीसाठी हातभार द्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विश्वास डिंगणकर - ८६८९८५१८६४ / दिपक फावरे - ८६८९९८४९५५ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment