दिलासादायक ! मुंबई-गोवा महामार्गाचे काम ‘या’ महिन्यापर्यंतच पूर्ण करणार ; नितीन गडकरींनी थेट तारीखचं सांगितली
Mumbai Goa Expressway
-----------------------------------------
मुंबई, गणेश नवगरे (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी या महामार्गाचे काम फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण करू असा आश्वासन राज्य शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयात देण्यात आलं. मात्र आता फेब्रुवारी २०२४ पूर्वीच या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
याबाबत खुद्द नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केल आहे. उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गाच्या कामासंदर्भात कोल्हापूर येथे त्यांची बैठक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत पार पडली.
या बैठकीत हा महामार्ग तयार करण्यासाठी नानाविध अशी अडचणी समोर येत असल्याचे सांगितले. या अडचणी गडकरी यांनी समजून घेतल्या. महामार्ग बांधण्यासाठी कंत्राटदारांनी अडचणी तयार केल्यात. महामार्गावरील मोठ्या पुलांचे काम सद्यस्थितीला अपूर्ण असून हे काम या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे.
या महामार्गाचे संपूर्ण काम या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल असं आश्वासन देखील या बैठकीत नितीन गडकरी यांनी उदय सामंत यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकदा अपघात देखील होतात.
मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने अपघातांची ही मालिका अद्याप कायमच आहे. याबाबत न्यायालयात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोल्हापूर मध्ये झालेल्या एका बैठकीत हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत विचारले असता नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२३ अखेर हा महामार्ग संपूर्ण बांधून तयार होईल अस आश्वासन दिल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम सध्या स्थितीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम आता डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल असं गडकरी यांनी सांगितलं असल्याने निश्चितच हा महामार्ग पुढील वर्षापासून प्रवाशांच्या सेवेत येईल आणि यामुळे अपघातात कमी येईल आणि कोकणातील प्रवाशांना याचा फायदा होईल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
No comments:
Post a Comment